पारगांवः धनाजी ताकवणे
दौंड तालुक्यातील पारगांव येथील ग्रामदैवत तुकाई मातेला साकडे घालत दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद मिळावे म्हणून कार्यकर्ते व राहुल कुल समर्थकांनी तुकाई मातेला जोडीने अभिषेक केला. नुकतीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली आणि दौंड विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा राहुल कुल हे आमदार म्हणून तिसऱ्यांदा निवडणून आले. दरनिवडणुकीवेळी दौंड तालुक्याला मंत्री पदाची हुलकावणी मिळाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जाहीर सभेत दौंड तालुक्याला मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. यामुळे नव्या मंत्रीमंडळात राहुल कुल यांची वर्णी लागली म्हणून पारगाव येथील कार्यकर्ते एकत्र येत जोडप्यांनी देवीला साकडे घातले.
यंदा मंत्री पदाचे आश्वासन दौंड तालुक्याला मिळणार असल्याचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल किंवा नाही परंतु गेली दोन विधानसभेला दौंडचे आमदार राहुल कुल या मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे. त्यांना मंत्री करावे म्हणून पारगाव येथील कार्यकर्त्यांनी एकत्र येत अनेक जोडप्यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री तुकाई देवीला अभिषेक करून साकडे घातले आहे. भानुदास शिंदे, सुभाष शिंदे, भाऊसो बोत्रे, बापू साळुंके, विजय शिवरकर, राजू महानोर, सागर ताकवणे, शरद शिशुपाल, नागेश मोरे, गौरव चव्हाण, संकेत ताकवणे, विक्रम शिंदे, योगेश वनशिव, राजेंद्र मोरे अशा १४ जोडप्यांनी मिळून देवीला अभिषेक केला.
यावेळी अतुल ताकवणे, अॅड.वैभव बोत्रे आदी उपस्थित होते.