शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख
शिक्रापूर ता. शिरुर येथील शिक्रापूर-चाकण रस्त्याने एक कुटुंब मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास प्रवास करीत होते. मात्र, या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. यावेळी येथील स्थानिक नागरिक व पोलिसांच्या तत्परतेने पुढे होणारा मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुटुंब बचावले असून, कार मात्र जळून खाक झाली आहे. कारला आग कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर ता. शिरुर येथील चाकण रस्त्याने बीडहून आलेले कार चालक विकास बरगजे हे त्यांच्याकडे असलेल्या कार मधून कुटुंबियांसह प्रवास करीत होते. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास कारच्या पुढील भागाने अचानक पेट घेतला. यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस हवालदार संदीप कारंडे, करंदी गावामध्ये रात्रगस्तीवर असलेले सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे, गणेश खेडकर, समीर पंचमुख, अमिल कंद्रूप, सोमनाथ सोनवणे, गितेश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
कारमधील कुटुंबियांना बाजूला हलवत आग विझवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. दरम्यान, नागरिकांनी कार बाजूला करीत वाहतूककोंडी सुरळीत केली. सदर घटनेत कुटुंब सुरक्षित आहे. मात्र, कार जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.