पुणे, ता.२५ : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात जीवनशैली, आहाराच्या पद्धती बदलल्यामुळे अनेकांना आजार कमी वयातच ग्रासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक आहे. अलीकडे हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. यावर जलदगतीने चालण्याचा व्यायाम उपयुक्त ठरत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
अभ्यासकांनी एक संशोधन केले. यामध्ये विशेषतः ज्येष्ठ महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका 34 टक्क्यांनी कमी झाल्याचा निष्कर्ष या समोर आला आहे. नुकत्याच केलेल्या एका संशोधनात जलद चालण्याच्या व्यायामामुळे महिलांना वृद्धापकाळातही हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकत असल्याचा दावा करण्यात आला आहे.