विरारः येथील एका नामांकित हॅाटेलमध्ये भाजपचे नेते विनोद तावडे आले असताना त्या ठिकाणी त्यांनी पैसे वाटल्याच्या आरोपावरून त्या ठिकाणी असणाऱ्या बहुजन विकास कार्यकर्ते आणि तावडे यांच्यात बाचाबाजी झाली असल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, भाजपमधील राष्ट्रीय नेत्यावर पैसे वाटल्याचा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व आरोपांचे खंडन विनोद तावडे यांनी केले आहे. बहुजन विकास पक्षाचे हितेंद्र ठाकूर यांनी ५ कोटी रूपये वाटल्याचा आरोप केला आहे. तावडे येथे ५ कोटी रुपये घेऊन आले होते. असा आरोप बहुजन विकास पक्षाचे कार्यकर्त्यांनी केला आहे.
येथील या नामांकित हॅाटेलमध्ये विनोद तावडे आणि वैभव नाईक बैठकीसाठी आले होते. त्या ठिकाणी बैठक सुरू असताना हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बहुजन विकास पक्षाचे कार्यकर्ते आणि तावडे यांच्यात येथे बाचाबाजी झाली. ही बाचाबाजी इतकी शेगेला पोहचली की त्यांच्यात मोठी बाचाबाची झाली. शितेज ठाकूर यांनी या व्हिडिओमध्ये एक डायरी हातामध्ये असून, या डायरीत पैशांबद्दलचा लेखाजोखा लिहिला असल्याचे म्हणणे त्यांचे आहे. या घटनेवर आता आघाडी आणि युतीमध्ये वाफयुद्ध सुरू झाले असल्याचे पाहिले मिळत आहे.
पैसे वाटल्याचा प्रकार म्हणजे प्रराभव समोर दिसल्याने केला जात असून त्या पैशांशी कोणत्याही संबंध नाही. पैसे कुणी आणले याची चौकशी पोलीस करीत आहेत.
वैभव नाईक
दोन डायरी मिळून आल्या आहेत. कसे कुठे वाटप केले याची माहिती त्या डायरीत आहे. ५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे.
हितेंद्र ठाकूर नेते बहुजन विकास पक्ष