राजगड न्युज
पुणे : पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर मुंबई दिशेने जाणाऱ्या पुणे नऱ्हे या ठिकाणी दोन ट्रक मध्ये भीषण अपघात झाला.या अपघातात धडक झाल्या नंतर वाहनास आग लागली व या आगीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जन जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सातारा कडून मुबई कडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच १० सी आर ८८९९ वरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुढे चालत असलेल्या एम एच १४ ईएम ७८८३ या आयशर टेम्पो ला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता कि या वाहनाचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून वाहनाला आग लागली या आगीत चार जणांचा जागीच म्र्त्यू झाला असून तीन जन जखमी असून त्याना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग टीम व ८ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश प्राप्त झाले आहे. प्राथमिक अंदाजा नुसार गाडी मधील शॉट सर्किट झाल्यानी आग लागली असून वाहनात भुसा असल्याने आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.