Sunday, June 28, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Breking News : पौड जवळ हेलिकॉप्टर अपघात: चार जखमी, दोनची प्रकृती गंभीर

मुंबईच्या ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे AW 139 हे हेलिकॉप्टर

by SBPRNL
August 24, 2024

पुणे: जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचे AW 139 हे हेलिकॉप्टर मुंबईच्या जुहू विमानतळावरून उड्डाण करून विजयवाड येथे जात होते. हे हेलिकॉप्टर पौड येथे घिरट्या घालत असताना अचानक कोसळले. या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली.

You might also like

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

बचावकार्य युद्धपातळीवर

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना कोसळलेल्या हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, कारण कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेलिकॉप्टरमधील प्रवासी

हेलिकॉप्टरमध्ये पायलट आनंद कॅप्टनसह दिर भाटिया, अमरदीप सिंग आणि एस पी राम असे चार प्रवासी होते. यापैकी आनंद कॅप्टन गंभीर जखमी असून ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. इतर तीन प्रवासींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

काय झाले असावे?

हेलिकॉप्टर कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडून सतर्कता

या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

https://youtube.com/shorts/TwW8ZPimS4A?si=Ic-U2mC6CK7pJm7N

विमानतळ प्रशासनाकडून चौकशी

या घटनेची गंभीर नोंद घेत मुंबई विमानतळ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. हेलिकॉप्टरची तपासणी करून या घटनेचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेलिकॉप्टर उद्योगावर प्रश्नचिन्ह

देशात हेलिकॉप्टर अपघातांची संख्या वाढत असून, यामुळे हेलिकॉप्टर उद्योगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हेलिकॉप्टरची सुरक्षा आणि देखभाल याबाबत योग्य ती पावले उचलण्याची गरज आहे, अशी मागणी सुरू झाली आहे

Tags: Helicopter crashPawdPune
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?
भोर

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला
भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

August 28, 2025
संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,
क्राईम

संतोष ट्रेडर्स फलटण यांच्याकडून दिवळे येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २६ लाखांची फसवणूक; बनावट ट्रक क्रमांकांचा वापर,

July 18, 2025
पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार
पुणे

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची नवी प्रभाग रचना आज जाहीर होणार

July 14, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
Next Post
भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

भोरः आतुरता बाप्पाच्या आगमनाची; कुंभारवाड्यात गणेशमूर्तींवर फिरवला जातोय अखेरचा हात

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group