मुंबईः राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची निश्चित झाले आहे. मात्र, या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर बरीच खलबंत केली जात आहे. काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला शिंदे हे फडणवीस आणि अजित पवार यांच्याआधीच शहा यांच्याकडे बैठकीसाठी पोहचले होते. महायुतीमधील भाजपाच्या सर्वाधिक जागा असल्याने मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात पडणार असल्याची दाट शक्यता आहे. आता या राजकीय घडामोडीत मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिंदे स्वतः सरकार मध्ये नसतील. त्यांच्याऐवजी नवीन चेहरा मंत्रीमंडळात दिला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची अॅाफर असून ते पद शिंदे घेण्यास तयार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे एकनाथ शिंदेंचे मनधरणीचे प्रयत्न सुरूच असून पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे असणार आहे. फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवार यांना देखील उपमुख्यमंत्री मिळणार आहे. मात्र पवारांना उपमुख्यमंत्री पदाबाबात कोणतीही अडचण नसून, शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद घेण्यास नकार दिला आहे. मग शिंदे यांना केंद्रात पाठणार असा देखील प्रश्न चर्चिला जात असून, त्यांनी तसे करून असे शिवसेना शिंदे आमदारांच्याकडून सांगण्यात येत आहे.