राजगड न्यूज वृतसेवा
पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील निगडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. पिंपरी-चिंचवड येथील निगडीमधील ओटास्कीम येथे ही घटना घडली आहे.
आकाश दूनधव (वय २२ राहणार ओटास्कीम, निगडी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, निगडीमधील ओटास्कीम येथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारात मागील वादाचा राग मनात धरून दोन तरुणावर धारदार हत्याराने वार करून आरोपी फरार झाले. त्यामध्ये आकाश गोरख दुनघव याचा मृत्यू झाला आणि आनंद उर्फ दादा राजू गवळी हा तरुण जखमी झाला. मृत तरुणाच्या नातेवाईकाने आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे ठरवले आणि सर्वजण निगडी पोलिस स्टेशन येथे जाऊन पोलिसांना धारेवर धरले.
निगडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकारी यांना तात्काळ कारवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे कबुल केले आहे. पुढील तपास निगडी पोलिस करत आहेत. मृत आकाश आणि आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.