मुंबईः भाजपची कोअर कमिटीची बैठक येथे पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचा विधिमंडळ गटनेते पदावर शिक्का मोर्तेब झाला असून तेच आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता त्या प्रस्तावास भाजपच्या सर्व आमदारांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले. यामुळे उद्या दि. ५ नोव्हेंबर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी मुख्यंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महराज की जय जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा सर्व आमदारांनी सभागृहात दिल्या. तसेच सर्वांचा लाडका भाऊ देवा भाऊ असे देखील यावेळी आमदार म्हणाल्या. भाजपच्या निरीक्षक म्हणून निर्मला सितारामन आणि विजय रुपाणी यांनी नेतानिवडीचे कामकाज पाहिले. राज्यात भाजपला १३२ जागांवर विजय मिळाल असल्याने आता उद्या मंत्रीपदावर कोणकोण विराजमान होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.