किरकोळ कारवाई झाली तर मोठे अवैध व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने सुरू.? जुगार , मटका, गुटखा या अवैध व्यवसायावर कारवाई होणार का?
भोर :शहरात रात्री मंगळवार (दि२८)आठवडे बाजाराच्या दिवशी पोलिसांनी दबंग कामगिरी करत तीन ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा मारीत शहरातील नागोबा आळी येथील सागर दशरथ धोंडे, पिराचा मळा येथील
हनुमंत सोपान मळेकर व नागोबा आळी येथील मंगेश हनुमंत चिकणे या तिघांवर अवैध दारू धंदा विक्री प्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई भोर व सासवडचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अशोक खुटवड, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, पोलीस हवालदार विकास लगस, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भिसे, पोलीस कॉन्स्टेबल अभय बर्गे यांचे पथकाने मंगळवारी रात्री भोर शहरात अवैध धंद्यावर तीन ठिकाणी छापे टाकून कारवाई केलेली आहे .
सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस नाईक धर्मवीर खांडे व पोलीस नाईक अतुल मोरे हे करीत आहेत.
किरकोळ कारवाई झाली तर मोठे अवैध व्यवसाय कोणाच्या वरदहस्ताने सुरू.?
भोर पोलिसांकडून मंगळवारी रात्री भोर शहरातील तीन अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या व्यवसायांवर कारवाई करण्यात आली त्यामध्ये सुमारे तीन कारवाईचा मिळून 2700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. करण्यात आलेली कारवाई नक्कीच प्रशंसनीय आहे तर यामध्ये किरकोळ दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्याचं तर स्पष्टच दिसत आहे. पुणे जिल्ह्यात बंदी असली तरी भोर शहरामध्ये आणि भोर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये जुगार,मटका,गुटखा विक्री अशा अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू आहेत परंतु या व्यवसायांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही यामुळे हे व्यवसाय नक्की कोणाच्या वरदहस्ताने सुरू आहेत हा प्रश्न देखील आता नागरिकांना पडलेला आहे.
भोर पोलिस किरकोळ अवैध व्यवसाय बरोबर आता मोठ्या अवैध व्यवसायांवर देखील चाप लावतील का? हे पाहणे नक्कीच ऊस्तुकतेचे असेल.