भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्यातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविका दिवस निमित्त (आशा डे निमित्त) शुक्रवार (दि.१) तनिष्का व्यासपीठ व उन्नती महिला प्रतिष्ठानतर्फे आशा सेविकांचा सन्मान करुन आशा दिवस साजरा करण्यात आला.
तालुक्यातील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेल्या सहा उपकेंद्रातील ४० आशा सेविकांना उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे यांच्या हस्ते गुलाबपुष्प व भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गावोगावी आरोग्य सेविका आशा सेविका चांगल्या प्रकारे काम करत आहे तसेच आशा सेविकांनी कोरोना काळात जीवाची पर्वा न करता उल्लेखनीय कार्य केले आहे हे केलेले काम कौतुकास्पद असून त्या करत असलेल्या कामाला आमचा सलाम आहे असे गौरवोद्गार सीमा तनपुरे यांनी यावेळी आशा सेविकांबद्दल बोलताना काढले. यावेळी अरुणा कुमकर, संध्या झगडे, मनीषा पडवळ, भागश्री वर्टे, रेश्मा म्हस्के उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा ,सुविधेंचा लाभ पोहचवणाऱ्या आशा सेविकांच्या कामाचा, आशा दिवसाच्या निमित्ताने सन्मान करण्यात आल्याने तनिष्का व्यासपीठ व उन्नती महिला प्रतिष्ठानचे आशा सेविकांनी आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी आशा गटप्रवर्तक, आशा सेविका तसेच नेरे आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचलन संध्या झगडे यांनी केले.