प्रतिनिधी -कुंदन झांजले
दुर्गम भागात नैसर्गिक आपत्ती, संकटात, अपघातात या साहित्याचा होणार उपयोग
भोर तालुक्यातील शिरगाव,वरंधा घाट परिसरामध्ये सातत्याने अपघात, नैसर्गिक आपत्ती अशा घटना होत आहेत. हा परिसर दुर्गम व डोंगराळ भाग परिसर असल्याने त्या भागामध्ये अपघात घडल्यानंतर मदतीसाठी पथक पोहोचण्यासाठी वेळ लागतो. आणि वेळेत मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तींच्या जीवावर बेतत आहे, काही वेळेस मदत मिळुनही आवश्यक साधन सामग्री नसल्याने काहीच करता येत नाही ब-याच अडचणी येत आहेत आणि त्याचमुळे तातडीने मदत मिळावी याकरिता नेहमीच मदतीला धावून जाणारे भोर तालुक्यातील ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर अध्यक्ष राजीव केळकर यांच्या वतीने व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या संकल्पनेतून दुर्गम व डोंगरी खोऱ्यातील रेस्क्यु टीम तरुणांना, भोर सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मार्गदर्शनाखाली ध्रुव प्रतिष्ठांचे हितचिंतक मार्गदर्शक, व उत्तम ट्रेकर्स कै. अशोक रामचंद्र कित्तूर यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त रेस्क्यू टीम साठी रेस्क्यू साहित्य शनिवार (दि.२८) प्रदान करण्यात आले
भोर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या हस्ते रेस्क्यू टीम शिरगाव ,वरंधा घाट यांना लाइफ जॅकेट , टॉर्च, वायर रोप, हेल्मेट , स्ट्रेचर, ट्रॅकिंग शूज व इतर साहित्य असे एकूण १ लाख ३६ हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले, यावेळी रेस्क्यूट टीम शिरगाव अक्षय शशिकांत, धुमाळ ,दत्तात्रय मारुती पोळ, आप्पाजी शिवराम पोळ, दत्ता दगडू पोळ, नवनाथ रामचंद्र पोळ, रमेश रावबा उंब्राटकर ,कृष्णा विठ्ठल पोळ ,अनिल चंद्र दिघे ,भिमाजी शंकर पोळ, गोपाळ गोविंद पोळ हे रेस्क्यु सदस्य व भोर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय खेंगरे उपस्थित होते सदर सदस्य हे सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स भोरचे अध्यक्ष सचिन सदाशिव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. रेस्क्यु साहित्य मिळाल्यावर अवघड, दुर्गम भागातील संकटात, आपत्तीत , अपघातात याचा चांगला उपयोग होईल असे यावेळी सांगण्यात आले.