भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर शहरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित भोरच्या महिला संचालक पदी आशालता सुतार, तज्ञ संचालक म्हणून अनंता कदम तर कार्यलक्षी संचालक म्हणून किरण रणखांबे यांची बिनविरोध निवड करण्यात शुक्रवार (दि.१७) करण्यात आली. सदर निवड सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय राजवाडा भोर येथे संपन्न झाली. सदर निवडणूक प्रक्रिया कामकाज सहाय्यक निबंधक बाळासाहेब तावरे यांचे मार्गदर्शनाखाली संजय पवार व अविनाश कांबळे यांनी काम पाहिले. यावेळी शिक्षक सेवक सहकारी संस्थेचे चेअरमन मोहन ताकवले, खजिनदार बजरंग सापे, सचिव केशव पवळे, संचालक विनायक धुमाळ, सोमनाथ सोडमिसे, सुदाम पारठे, संतोष पुरोहित, उपस्थित होते.
यावेळी सूचक म्हणून भारती मोरे, तर अनुमोदक सुरेश वाडकर यांनी दिले.प्राध्यापक लक्ष्मण भांगे, आनंदराव वीर, उदय लाळे, दत्ता मळेकर यांनी नवनिर्वाचित संचालक यांचे अभिनंदन केले तर आभार सोमनाथ सोडमिसे यांनी मानले.