भोर प्रतिनिधी – कुंदन झांजले.
भोर : शहरातील भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी भोर शहराच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी पक्षाचे विश्वासु पंकज खुर्द या तरुण नवीन कार्यकर्त्याला पसंती देत अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड केली व तालुकाध्यक्ष पदी जीवन कोंडे हे पुन्हा अध्यक्ष म्हणून कायम ठेवण्यात आले आहेत.
आगामी येणा-या जिल्हा परिषद , पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण विभागाचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी भोर शहर भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा ग्रामीण दक्षिण विभागाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर केल्या. यामध्ये शहराचे अध्यक्ष सचिन मांडके यांची बढती होत जिल्हा कार्यकारिणीच्या चिटणीस पदी निवड झाल्याने शहराध्यक्ष हे पद रिक्त झाले होते.त्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी पंकज खुर्द या तरुण चेह-याला संधी देत निवड केली आहे.
शहरातील भाजपा पक्ष मजबूत , बळकट करण्यासाठी संघटनात्मक पक्ष बांधणी करणार असून, जनतेच्या विकास कामावर काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज खुर्द यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण दक्षिण विभागाच्या १४ मंडलाची भाजपा प्रमुख नेत्यांच्या मार्गदर्शनाखाला हि निवड केल्याचे जिल्हा अध्यक्ष काळे यांनी सांगितले . पंकज खुर्द यांची शहराध्यक्ष निवड झाल्याने त्यांच्यावर शहरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.