भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोरला मराठा आंदोलकाचा साखळी उपोषणात उद्रेक.
सकल मराठा समाजाच्या वतीने भोरला मराठा योध्दा मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात चालू झालेले उपोषणात आंदोलकांचा उद्रेक झाला असून सत्ताधारी राजकीय नेत्यांचे फ्लेक्स फोटोंची तिरडी काढून त्या नेत्यांची चिता सोमवार (दि३०) सायंकाळी करण्यात आली .
जोपर्यंत सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य करीत नाहीत.त्यांच्या उपोषणाची दखल घेत नाही तोपर्यंत भोरमधुन साखळी उपोषणाची माघार नाही.काल एस टी बसेस वरील सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या जाहिरातीतील फोटोला काळे फासले होते ,आणि आज सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या फ्लेक्सची तिरडी काढून चिता पेटविली. काही संतप्त मराठा आंदोलकानी मुंडन करून, नेत्यांच्या निषेधार्थ बोंबा ठोकल्या. मराठा आरक्षण आंदोलनाची पडलेली ठिणगी ही उद्या मोठा वनवा होणार यात तिळ मात्र शंका नाही असे सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजय भेलके यांनी सांगितले.