भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
भोर तालुक्यातील विसगाव खो-यातील भाबवडीतील प्लास्टिक कचरा , काळ्याकुट्ट धुराची घटना ताजी असतानाच हिरडस मावळ खो-यातील नांदगाव (ता.भोर) येथे बुधवार (दि.३) दुपारी १च्या सुमारास तेथील खडीमशीन क्रेशरच्या ब्लास्टने नांदगाव हादरून गेले. हा ब्लास्ट एवढा प्रचंड जोराचा होता की याच्या हाद-याने विष्णू हरिभाऊ कुडले या शेतक-याच्या घराची भिंतच कोसळली. तसेच अनेकांच्या घरांना चिर पडून तडे गेले आहेत. विष्णु कुडले यांच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. अशी माहिती या गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थांनी दिली . सदर घटनेची प्रशासनाने दखल घेतली असून ग्रामसेवक,तलाठी हे घराचा पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
या गावच्या हद्दीत असणाऱ्या या खडी मशीन क्रेशरचा येथील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.