महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
भोर – शहरात महाराष्ट्रभूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने रविवार (दि.२) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले .हे अभियान प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. या अभियानाकरिता भोर नगरपालिकेचे नगरसेवक गणेश पवार तसेंच दैनिक सकाळचे वार्ताहार विजय जाधव व श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभियानासाठी प्रतिष्ठानचे २१० श्री सदस्य सहभागी झाले होते. या अभियाना अंतर्गत ४६ टन कचरा संकलित करून वर्गीकरण करण्यात आला. यावेळी शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालय भोर, शिवतीर्थ चौपाटी परिसर, पोलीस स्टेशन, डोंगरी विकास परिषद परिसर, महाड नाका, वन विभाग कार्यालय, महाराणा प्रताप प्राथमिक विद्यालय, एस स्टी स्टँड स्मशानभूमी परिसर तसेच भोर शहरातील पेठेतुन स्वच्छता करण्यात आली.
समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपन करत ज्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण ,आरोग्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा ,अज्ञान , जातीभेद , अनिष्ट रूढी परंपरा, स्त्रियांवरील अत्याचार अशा अनेक सामाजिक विषयांवर निरूपणाद्वारे समाज प्रबोधन करत मनुष्य जीवन संस्कारमय करत जगभरात समाजप्रबोधनाचा प्रसार केला. अशा महाराष्ट्रभूषण डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त हे महास्वच्छता अभियान शहरांतून राबविण्यात आले आहे.