जेजुरीः हरियाणा विधानसभेवर तिसऱ्यांदा भाजप विजयी झाल्याबद्दल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष केला. याावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा प्रकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी पश्चिम प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामटे, पुरंदर तालुका निलेश जगताप, कोल्हापूर प्रभारी अलका शिंदे, पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष रवींद्र खोमणे, पुरंदर महिला मोर्चा अध्यक्ष मंगल पवार, जेजुरी महिला मोर्चा अध्यक्ष उर्मिला खुंटे, मंडलाध्यक्ष जेजुरी शहर गणेश भोसले, ओबीसी जेजुरी मोर्चा अध्यक्ष शिवदास झगडे तसेच भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.