बारामती – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शुक्रवारी (ता.20) बारामतीत मनोज जरांगे पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.बारामती शहरातील तीन हत्ती चौकामध्ये दुपारी चार वाजता ही सभा होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आली.मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिकेला मराठा समाजाच्या वतीने उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.या पार्श्वभूमीवर बारामती मध्ये त्यांचे सभा होत असल्याने या सभेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बारामती शहरात विविध सभा, आंदोलन व मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आता बारामती शहरात जरांगे पाटील येत असून त्यांची सभा होणार असल्यामुळे याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.