जेजुरीः २० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. यंदा राज्यात ६१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी सांगते. २३ नोव्हेंबरला निकाल लागला आणि महायुतीला घवघवीत यश मिळून भाजपला १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी ४१ जागा मिळाल्या. आठवड्याभरापासून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा झडताना दिसत आहे. तसेच नव्या सरकारमध्ये इतके आमदार शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच शपथ घेणार असल्याची दाट शक्यता आहे. तर शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर ५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपची गटनेता पदाची निवड झाल्यानंतर दिल्लीतून मुंबईत निरीक्षक येणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासाठी आग्रही नसून ते पद मिळालेच तर शिवसेनती दादा भुसे, उद्य सामंत किंवा शंभूराज देसाई यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहमंत्रीपदासाठी देखील शिवसेना विशेष आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महत्वाच्या खात्यांचे मंत्री पद मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी दादांना उपमुख्यमंत्री पद आणि काही महत्वाची खात्यांवर मंत्रीपदासाठी आग्रही आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पद देण्यासाठी कोणत्याही गोष्टीची अडचण नसून खात्याबाबत काही मतभेद होऊ शकतात.
भाजप २०, शिवसेना १२, राष्ट्रवादी ९
येत्या ५ डिसेंबरला नव्या सरकारच्या नव्या मुख्यमंंत्र्यासोबत भाजपचे २०, शिवसेना १२ आणि राष्ट्रवादी ९ आमदार मंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत असून, मंत्र्याची नावे आणि खाते अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. तसेच नव्या सरकारमध्ये ४ महिला आमदारांना मंत्री मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये आदित्य तटकरे, देवयानी फरांदे, श्वेता महाले यांची नावे आघाडीवर आहेत.