कलानगरीः सिने इंडस्ट्रीत दिवंगत अभिनेते राज कपूर यांचे नाव आदराने घेतले जाते. एक काळ होता की सिनेमा इंडेस्ट्रीत स्वःताला सिद्ध करण्यासाठी राज कपूर यांनी मोठ्या खस्ता खाल्या. त्यांच्या सिने कारकीर्दीत त्यांनी अनेक उत्तमोउत्तम सिनेमे केले. आजही त्यांचे सिनेमे सिनेमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दाखवले जातात. त्यांच्या जन्म शताब्दी निमित्ताने पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कपूर कुटुंबातील सदस्यांची भेट घेत राज कुपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अभिनेता रणबीर कपूर याने पंतप्रधान मोदींना १३ डिसेंबर रोजी राज कपूर यांच्या सिनेमासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
फिर सुबह होगी, आज सुबह हो गई….!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी केलेल्या सिनेमांबद्दल आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. तसेच फिर सुबह होगी या त्यांच्या सिनेमाबद्दल घडलेला किस्सा देखील यावेळी सांगितला. जनसंघ ज्यावेळी होता. त्यावेळी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत पराभवाचा सामाना करावा लागला होता. यावेळी काय करायचं असा विचार करीत असताना एक पिक्चर पाहिला त्या पिक्चरचं नाव होतं फिर सुबह होगी आणा आज सुबह हो गई असे मोदी यावेळी म्हणाले.