गेल्या काही दिवासांपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे बोलले जात होते. त्या दृष्टीने राजकीय पक्षातील हालचालींना देखील वेग प्राप्त झाला होता. महायुती सरकाराने बैठका घेऊन राज्यात निर्यणांचा धडाका सुरू केला होता. यामुळे सहाजिकच केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली होती. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने या संबंधी दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यामुळे आता राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली जाणार असून, निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. २९ अॅाक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. ३० अॅाक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. ४ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार
राज्यातील मतदारांची संख्या
राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदार संघ आहेत. त्यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ४ कोटी ५९ लाख असून, महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६४ लाख इतकी आहे. तसेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५५ हजारांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दिव्यांग मतदार ६ लाख ३२ हजार आहेत. एकूण मतदारांची संख्या ९ कोटी ३ लाख असून, नवमतदारांची संख्या १३ लाख आहेत.
- ८५ वर्षांवरील मतदानरांना घरीच राहून मतदान करण्याची सुविधा.
- व्होटर अॅपवर मतदार सर्व माहिती तपासू शकतात.
- पैसे, मद्य, ड्रग्जच्या वाटपावर करडी नजर असणार.
- २ किमीच्या आत सर्व पोलिंग स्टेशन असावेत.