पेण प्रतिनिधि (किरण बांधणकर)
पेण : तालुक्यातील पूर्व विभागातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत असलेल्या आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने सरपंच ज्योत्स्ना हरेश वीर यांनी ठरल्या प्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता अंबेघर सरपंचपदी सरिता गोपाळ वाघमारे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याने सर्व ग्रामस्थ मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी बोलतना मंगेश दळवी यांनी सांगीतले की आंबेघर ही पूर्व भागाची वेस असल्याने या ग्रामपंचायतीसारखा विकास सर्व गावात होईल याकडे सर्व गावाचे लक्ष राहत असत यागावत आधीच्या सरपंच यांनी केलेल्या चांगल्या विकास कामा मुळे नवनिर्वाचीत सरपंच सरिता वाघमारे यांची जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी असेच एकत्र रहाऊन गावाचा विकास साधावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
तर सरपंच पदावर असताना ज्योत्स्ना हरेश वीर यांनी गावाच्या विकासासाठी चांगले काम केले आहे,त्यांनी ठरल्याप्रमाणे स्वइच्छेने राजीनामा दिला आहे हे संस्कार अंबेघरमध्ये पहायला मिळत आहे.येथे अनेक विकास कामे झाली आहेत आणि पुढे ही विकास कामे राहणार असल्याचे यावेळी शिरीष मानकवळे यांनी सांगीतले.
उपस्थीत ग्रामस्थ मान्यवर मंगेश दळवी, शिरीष मानकवळे, माजी सरपंच ज्योत्स्ना वीर,माजी उपसरपंच मंगेश काईनकर, नवनिर्वाचित सरपंच सरिता वाघमारे, उपसरपंच सोनाली वडे,विठ्ठल वाघमारे, कपिल वाघमारे, विद्या पाटील, चंद्रकांत पाटील, रघुनाथ टेंबे, प्रमेद लंबाडे, हरेश वीर, प्रदीप पाटील,स्वप्निल बडे, विलास पाटील, नाघु टेंबे,नरेश ढेने, सर्कल प्रकाश मोकल, ग्रामसेवक जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंच सरिता वाघमारे यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.