मुंबईः महायुतीच्या सरकारचा शपथविधी समारंभ आझाद मैदानावर काही तासांत पार पडणार आहे. आझाद मैदानावर कार्यकर्ते आणि समर्थ दाखल व्हायला सुरूवात झाली असून, मोठ्या प्रमाणार सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. या शपथविधी समारंभात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का यावर मोठे राजकीय घमासान सुरू होते. अखेर या घमासानाला पूर्णविराम लागला असून, शिवसेनेतील नेत्यांनी शिंदेंची मनधरणी केल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. याचे पत्र शिवेनेचे उदय सामंत यांनी राजभवनावर जात राज्यपाल यांच्याकडे दिले आहे.
गेल्या काही दिवासांत मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांची वर्णी लागणार हे जवळपास फिक्सच होते. प्रश्न होता शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही यावर मोठा संमभ्र होता. अखेर आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. असे असले तरी मंत्रीपद आणि खाते वाटप यावर मोठी रस्सीखेच करण्यात येणार आहेत. यामुळे आता मंत्रीपदाची शपथ होणार की नाही आणि झालीच तरी कोणकोण शपथ घेणार याची उत्सुकता लागलेली आहे.