दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते महेश कोठारे या वडिलांना गुरुस्थानी ठेवून आदित्य कोठारे यांनी बालपणापासून जो चित्रपट प्रवास सुरू केला तो आतापर्यंत त्यांचा सुरू आहे. ‘स्टार सन’ने चित्रपटात येणे तसे नवीन नाही. परंतु, तो कलाकार कोणत्या भूमिका करतो आणि त्याला न्याय देतो का यावर त्याची लोकप्रियता अवलंबून असते. विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळणे म्हणजे तुमच्याकडे अभिनयाचे वैविध्य आहे हे लक्षात येते. आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करत अभिनेता आदिनाथ कोठारेने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आदिनाथचा ‘रॅपर स्वॅग’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. (Entertainment News) त्याचा हा रॅपर स्वॅग जिओ सिनेमावरील ‘बजाव’ या वेबसीरिज मधला आहे. ही वेबसीरिज नुकतीच जिओ सिनेमावर दाखल झाली आहे.
‘बजाव’ या वेबसीरिजमध्ये ‘ओजी’ या दिल्लीतल्या रॅपरची खलनायकी छाप असलेली भूमिका त्याने साकारली आहे. बॉडी लँग्वेजपासून ते अगदी शिव्यांचा ‘रिदम फ्लो’ कसा असायला हवा? (Entertainment News) या सगळया गोष्टी आदिनाथने स्वतःमध्ये बारकाईने भिनवत हा दिल्ली येट ‘ओजी’ रॅपर साकारला आहे.