पारगांवः धनाजी ताकवणे
पारगांव (ता.दौंड) आजच्या भरकटत चाललेल्या पिढीला आई बापाचा त्याग कळावा, आपला बाप कळावा आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रबोधनाची नाही, तर परिवर्तनाची गरज आहे. जे युवक युवती खोट्या प्रेमाच्या कृत्याला बळी पडतात, आपल्या आई-वडिलांची मान झुकली जाणार नाही, आपल्या आई वडिलांना जिवंतपणे यातना देऊ नका, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा असे “हृदयस्पर्शी” व्याख्यान समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांनी पारगांव येथील कार्यक्रमात दिले.
पारगाव येथील माऊली ताकवणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्त वाघजाई, पंचशील, रेणुका, राजेंद्र संभाजी मित्रमंडळ, स्वामी विवेकानंद विचार मंच यांच्यावतीने पारगांव येथे प्रथमच हा भव्य दिव्य समाजप्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रथमच पारगाव येथे आयोजित केलेल्या या व्याख्यानातून अनेकांचे कंठ दाटून आले. पंचक्रोशीतून अनेकांनी या व्याख्यानाचा आनंद घेतला. पारगाव महिला भगिनी, मान्यवर पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निश्चित फॅशन म्हणून नाच गाणे धिंगाणा बघण्यापेक्षा आजच्या पिढीसाठी एक छान परिवर्तन घडवणारे आई, बाप या विविध मुद्यावर युवा पिढीवर संस्कार घडेल, असे कार्य करणारे व्याख्यान योग्य असल्याचे ज्याचे त्यानेच ठरवावे लागेल. यापुढे असे व्याख्याने आयोजित केले तर निश्चित आपल्या मुलांच्यावरती चांगले संस्कार व बदल घडल्या शिवाय रहाणार नाही, अशी भावना अनेक महिला पालकांकडून व्यक्त केली.
या व्याख्यानाची संकल्पना व आयोजक विजय शिवरकर, अतुल ताकवणे, शरद शिशुपाल, गौरव चव्हाण, निलेश शिंदे, किशोर सोनवणे, दिपक शिशुपाल, हनुमंत वसव, प्रतीक ताकवणे,सार्थक ताकवणे, गणेश ताकवणे, पप्पू शिशुपाल, राहुल टिळेकर, सागर शेलार, योगेश वनशिव, अमोल गायकवाड, तुषार होले, संकेत आरवडे, प्रदीप कांबळे, रणजीत कांबळे, गणेश वनशिव, मंगेश गायकवाड, विकास शिशुपाल तसेच सर्व मित्र मंडळाकडून परिश्रम घेत माऊली (आण्णा) ताकवणे यांचा अभिष्टचिंतन सोहळ्याला एक विचार परिवर्तनाची अनोखी हृदयस्पर्शी भेट देण्यात आली.