शिरवळ : शिरवळ(ता. खंडाळा) येथील हजरत कमानपीर दर्गाहजवळील इमारतीला मंगळवारी (दि.१४ नोव्हेंबर) मध्यरात्री आग लागली. या आगीत इमारतीत असलेले टेलरिंग दुकान संपूर्ण जळून खाक झाले आहे. तर सुदैवाने या आगीत कोणती जीवितहानी झाली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की, शिरवळ ता.खंडाळा येथील हजरत कमानपीर दर्गाहजवळील इमारतीला आग लागण्याची घटना घडली दर्ग्यातील सेवेकरींने आग विझवण्यासाठी शर्थीचे मोठे प्रयत्न केले, या सेवेकरींने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, या आगी मुळे मोठ्या प्रमाणात टेलरिंग दुकानातील मालमत्तेचे नुकसान झाले असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.घटनेची माहिती मिळताच शिरवळ ग्रामपंचायत सदस्य ॲड.आनंद फडके व शिरवळ पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारी व दर्ग्यातील सेवेकरी यांच्या मदतीने आग विझवण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली.आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
विशेष म्हणजे संपूर्ण आग विझवल्यानंतर घटनास्थळी अग्निशामक बंब दाखल झाला. यामुळे शिरवळ गावात अशा घटनांसाठी एक अग्निशामक बंब तत्पर असावा अशी शिरवळ ग्रामपंचायत सदस्य आनंद फडके यांनी मासिक सभेमध्ये याविषयी मागणी करणार असल्याचे सांगितले.