फलटणः केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या केंद्रीय गृह मंत्रालय दक्षता पदकाच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांना उकृष्ट कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार आहे. यामध्ये फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांचे नाव असून, त्यांना पोलीस दलातील उत्कृष्ट तपासाची कामगिरीसाठी हे पदक देण्यात येणार आहे. त्यांना हे पदक जाहीर झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीप्रत्यर्थ हे पदक दरवर्षी देण्यात येते. महाराष्ट्र राज्यातील एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. यामुळे पोलीस अधिक्षक समिर शेख, वैशाली कडुकर जिल्ह्यातील व तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.