शिरवळः येथील पंढरपूरफाटा जवळ असणाऱ्या सोसायटीतील बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी तब्बल ३ लाख ७० हजार किंमतीचा मौल्यवान ऐवजावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रदिप बबन पवार (वय-54 वर्षे, रा. पंढरपुरफाटा, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा यांनी शिरवळ पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या पत्नीसोबत येथील एका सोसायटीमध्ये राहतात. त्यांची मुलगी पाटस या ठिकाणी तिच्या नवऱ्यासोबत राहते. मुलीला भेटण्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी गेले असता बंद असलेल्या फ्लॅटचे कूलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश करीत मौल्यवान ऐवज चोरून नेला. या घटनेची अधिकची माहिती अशी की, फिर्यादी व त्यांच्या पत्नी मुलीच्या घरी असताना दि. १४ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे तुषार कुचेकर यांनी मला फोन करून सदर घटनेबाबत माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच फिर्यादी व त्यांच्या पत्नी येथे दाखल झाले. त्यांनी तेव्हा लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये छोट्या पर्समध्ये ठेवलेले सोने आहे का? चेक केले असता ड्रॉव्हरमध्ये सोने ठेवलेली पर्स दिसून आली नाही. यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने फ्लॅटचे सेप्टी डोअरचे कुलूप कशानेतरी तोडून घरफोडी करून फ्लॅटचे बेडरूममधील लाकडी कपाटातील ड्रॉव्हरमधील सोने ठेवलेली पर्स चोरून नेली. आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
चोरीला गेलेला मौलवान ऐवज
- सव्वा सहा तोळे वजनाचे पदक व चैनीमधील सोन्याचे गंठण किंमत २ लाख ६० हजार
- एक लहान साखळीची साडेचार ग्रॅम वजनाची चैन किंमत २० हजार
- एक अडीच ग्रॅम वजनाची ठुशी किंमत १० हजार
- एक साडेचार ग्रॅम वजनाचे वेडणे, आणि पाच ग्रॅम वजनाची कासवाची डिझाईन असलेली अंगठी किंमत ४० हजार
- एक चार ग्रॅम वजनाचे वाट्या असलेले डोरले किंमत २० हजार
- दोन अडीच ग्रॅम वजनाचे कानातील वेल किंमत १० हजार
- दोन अडीच ग्रॅम वजनाचे कानातील फुलाची डिझाईन असलेले टॉप्स किंमत १० हजार
- एकूण मिळून ३ लाख ७० हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.