साताराः अगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागल्याचे पाहिला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील महायुतीमधील घटक पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनात काय चाललेले आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पितृपंधरवडा संपल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांची थेट संवाद यात्रा सुरू करणार असल्याचे संकेत जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी दिले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागांवर भगवा फडकविण्यासाठी कटिबद्ध
राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीचे तिन्ही घटक पक्ष चांगलेच सक्रिय झाल्याचे पाहिला मिळत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकेच्या दृष्टीने शिवसेना शिंदे गट पश्चिम महाराष्ट्रात आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याकरिता आग्रही आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यासाठी कमालीचे आग्रही झाले असल्याची माहिती आहे.
जागा वाटपात शिंदे गटावर अन्याय झाल्यास आठही मतदार संघावर दावा सांगणार
पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाच्या जागांवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या दृष्टीने तयार केली जात आहे. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सज्जतेचे आदेश देऊन त्यांची मनोगते जाणून घेतली. प्रत्यक्ष कामकाजात त्यांना कोणत्या अडचणी येतात, त्यांची मनोगते काय आहेत याच्यावर सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये शिवसेना शिंदे गटावर अन्याय झाल्यास जिल्ह्यातील आठही मतदारसंघांवर दावा सांगणार असल्याचे शिंदे गटाची तयारीअसल्याचे सांगण्यात आले आहे.
पितृपंधरवड्यानंतर तालुक्यातून शिंदे गटाची संवाद यात्रा
तसेच या बैठकीत सातारा जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या संदर्भातील आढावा घेण्यात आला. लाडकी बहीण योजना ही अत्यंत लोकप्रिय योजना ठरली असून, या माध्यमातून महिला संघटनेचे मोठे जाळे जिल्ह्यात उभे राहिले आहे. लाडक्या बहिणींना सातारा जिल्ह्यात काय अडचणी येत आहेत. तसेच शासनाने राबवलेल्या कल्याणकारी योजना कोणकोणत्या आहेत, याची माहिती देण्यासाठी पितृपंधरवड्यानंतर महाबळेश्वर तालुक्यातून शिवसेना शिंदे गटाची संवाद यात्रा सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत पुरुषोत्तम जाधव यांनी दिले आहेत. सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिने शिवसेना शिंदे गटाच्या सदस्य नोंदणी, बूथ रचना तसेच शासकीय योजनांचा प्रसार व प्रचार सूचित केले असून शिवसैनिकांनी त्या दृष्टीने तयारीत रहावे असे निर्देशित करण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव हे स्वःताह विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
जिल्हाप्रमुख जयवंत शेलार,जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, युवा सेना जिल्हाप्रमुख रंजीत भोसले, सुलोचना पवार, हेमलता शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक पैलवान गोडसे, चंद्रकांत गुरुजी, वासूदेव माने, बाळासाहेब जाधव तसेच जिल्ह्यातील उपजिल्हाप्रमुख, विधानसभा संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुख, शहर प्रमुख, विभाग प्रमुख, युवासेना व महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सातारा जिल्ह्याचा दौरा लक्ष मात्र वाई विधानसभा मतदारसंघावर
पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसभा मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली असून, 2009 पासून जाधव यांचा जनाधार या मतदार संघात सातत्याने वाढताना दिसत आहे. खंडाळा तालुक्याचे दुष्काळ प्रश्न सोडवण्याकरता पुरुषोत्तम जाधव यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी आणला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुरुषोत्तम जाधव यांचा जिल्हा दौरा सुरू होणार असला, तरी त्यांचे लक्ष मात्र वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघावर असणार आहे. आता महायुतीच्या राजकीय तडजोडीत वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे त्यांना थांबावे लागले. यंदा मात्र, पुरुषोत्तम जाधव खंडाळा तालुक्याचे अस्मितेसाठी आक्रमक होणार हे निश्चित असून, या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय आदेश देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या बांधणीमध्ये शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे, शिवसैनिकांनी बूथ लेव्हलपासून प्रामाणिकपणे काम केल्यास कोणताही विजय अवघड नाही. जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुखांच्या सर्व भावना या एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातील
जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव