निरा: येथील मुस्लिम समाजाच्या दफन भूमितील बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत भ्रष्टाचाराची चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मुस्लिम दफनभूमी निरा-शिवतक्रार प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बुधवार दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता मुस्लिम दफनभूमी निरा-शिवतक्रार प्रवेशद्वारा जवळ ठिया आंदोलनाला सुरुवात झाली. या आंदोलनामध्ये अकबर सय्यद, अन्वर शेख, रशीद सय्यद, मुन्ना डांगे, टी. के. जगताप, गणेश गडदरे, दयानंद चव्हाण, हरुण बागवान, अमlनूल्ला डांगे, शफिक कुरेशी, रईस शेख, संग्राम घोणे, अमोल साबळे, असलम सय्यद आणि नानासाहेब जगदाळे यांनी सहभाग नोंदवला. सदर मागणी ही समाज हिताची व रास्त असल्याने आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्तपणे पाठबळ मिळत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.