सासवडः प्रतिनिधी बापू मुळीक
आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची 233 वी जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात पार पडली. युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उमाजीराजे नाईक यांची जयंती जेजुरी गडावर मध्यभागी असलेल्या उमाजीराजे नाईक यांच्या पुतळ्यालाच्या ठिकाणी साजरी साजरी करण्यात आली. यावेळी उमाजीराजे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुष्पदृष्टी करून मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, माजी प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, अॕड विश्वास पानसे, व्यवस्थापक आशिष बाठे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, भारतीय जनता पार्टी, पुणे जिल्हा अध्यक्ष भटक्या विमुक्त जाती-जमाती रविकाका खोमणे, भाजपा जेजुरी शहर माजी अध्यक्ष अशोक खोमणे, उपाध्यक्ष माऊली खोमणे, कामगार नेते सुरेश उबाळे, विठ्ठल जाधव, सागर खोमणे , सोमनाथ मदने, मा. नगरसेवक सुंदर तात्या खोमणे, शिवसेना शहर प्रमुख विठ्ठल सोनवणे, जय मल्हार क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष अंकुशराव जाधव, मनोज भाऊ आडके फलटण, राजाभाऊ खोमणे, राजाभाऊ चौधरी पश्चिम महाराष्ट्र धर्म जागरणचे प्रमुख, सुरेश खोमणे, अर्चना पोकळे, संपदा खोमणे भाजपा महिला आघाडी सरचिटणीस जेजुरी शहर, दादासो खोमणे, दादा चव्हाण, राहुल खोमणे तसेच श्री मार्तंड देवसंस्थान जेजुरी यांच्या वतीने शालेय गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकाका खोमणे यांनी केले व सूत्रसंचालन शिवाजीराजे चव्हाण यांनी केले. तसेच अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन झाले आणि कार्यकमांचे आभार माऊली खोमणे यांनी मानले.