सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. समाजातील मागास घटकांना विविध ठिकाणी सामावून घेवून मुख्य प्रवाहात आणावे आणि जवळपास संख्येने राज्यात 85 लाखाच्या आसपास असलेल्या समाजाला सामाजिक आणि राजकीय न्याय मिळावा यासाठी शिंदे हे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाला समाजाच्या वतीने पाठिंबा मिळत असून, अनेक पदाधिकारी त्यांची उपोषण स्थळी येऊन भेट घेत आहे.
‘या’ आहेत प्रमुख मागण्या
- रामोशी समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा.
- राजे उमाजी नाईक महामंडळाचे अध्यक्ष हे रामोशी समाजातील असावेत.
- समाजातील व्यक्तीला विधान परिषदेवर संधी मिळावी.
- आद्य क्रांतीकारक राजे उमाजी नाईक जयंती संसद भवन येथे साजरी करावी.
या आणि अशा विविध मागण्यांसाठी शिंदे हे आमरण उपोषणास बसलेले असल्याची माहिती त्यांनी स्वःताह दिली आहे. तसेच आपल्या संयुक्तिक मागण्यांसाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आपणास पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी तालुकाप्रमुख अभिजित जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे, बहुजन हक्क परिषदेचे सुनिल धिवार, बहुसंख्येने सदस्य, माजी सरपंच भैय्या खोमणे, मातॅड साठे, नमिता भंडलकर, काजल यरमल, रवि खोमणे, गजानन ढवले, अशोक खोमणे, विठ्ठल रनावरे, लखन चव्हाण, सयाजी बुधावले, नाना पोल, युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी शुभम झिंजुरके, कृष्णा कामठे, साधु दिघे पत्रकार आदीनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बहुसंख्येने पुरंदरमधील पदाधिकारी आदी उपस्थित होते. 7 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक स्वरूपात साजऱ्या होणाऱ्या राजे उमाजी नाईक जयंतीच्या शुभेच्छा देण्याता आल्या.