शिरवळः शहराची लोकसंख्या अधिक गतीने वाढत असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिक्षणाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्राथमिक शाळेच्या आधुनिकरणाकडे लक्ष देत गोरगरीब जनतेच्या मुलांनी दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे हा घेतलेला ध्यास अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शिरवळ येथे काढले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सटवाई कॅालनी शिरवळ शाळेच्या नव्या इमारतीचा हस्तांरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नव्या इमारतीच्या उद्घाटनचा कार्यक्रम ग्रामपंचायत शिरवळच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजनयांची विशेष उपस्थिती लाभली व त्यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमास शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या देखील उपस्थित होत्या. या शाळेचे बांधकाम टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने करण्यात आले असून, शिरवळ ग्रामपंचायतीने यासाठी पुढाकार घेतला होता. सदर इमारत ही टीई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने सीएसआर फंडाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी २७ लाख रुपये उपलब्ध करुन दिले. या खर्चातून ही नवी इमारत उभारण्यात उभी करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी शिक्षक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
शिक्षणाला महत्व देत सीएसआर फंडाच्या माध्यमातून उभी केली नवी इमारत, अनेकांच्या योगदानामुळे हे शक्य झाले: मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या ,सातारा जिल्हा हा खरे तर क्रांतीक्रारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जी इमारत उभी राहिली आहे, त्यासाठी अनेकांची योगदान लाभलेले आहे. आमच्याकडे जवळपास ३००० शाळा आहेत, त्या प्रत्येक शाळेत आम्हाला जाणे शक्य नाही. पण शाळा मोठी म्हणजे शाळेतील पटसंख्या मोठी असल्यास तिथे जाणे गरजेचे आहे. तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येत सीएसआर फंडाच्या माध्यमातून किती सुंदर इमारत उभी केली आहे. शिरवळ मोठे गाव असून देखील या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत, परंतु शाळेला महत्व म्हणजेच शिक्षणाला प्राधन्य देत हे काम पूर्ण केल्यामुळे खूप आनंद झाल्याचे नागराजन यांनी सांगितले.
पुढच्या वर्षी पुन्हा आल्यानंतर मुले इंग्रजीमधून संवाद साधतील: नागराजन
तसेच पुढच्या वर्षी मी ज्यावेळी या शाळेत पुन्हा येईल, त्यावेळी शाळेची पटसंख्या वाढलेली असेल, आम्ही यावेळी इंग्रजीमध्ये बोललो पुढच्या वेळी आल्यानंतर येथील मुले आमच्याबरोबर इंग्रजीत बोलतील, यासाठी आमचे शिक्षक प्रयन्नशील असतील. अशी आशा देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तसेच गुणवत्ता देण्याचे काम या गुरुजनांचे अशी भावना उदय कबुले यांनी व्यक्त केली.
प्रगती करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाहीः सरपंच रविराज दुधगावकर
सटवाई कॅालनी ही कष्टकऱ्यांची व श्रमिकांची वस्ती आहे. वस्तीमध्ये अल्प उत्पन्न असल्यामुळे प्रगती करण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. सटवाई येथे डिजिटल पद्धतीने शाळा सुरू करण्यात आली आहे. अत्याधुनिक पद्धतीने शाळा करण्यात आल्याने सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यावेळी जि.प चे माजी अध्यक्ष उदय कबुले , माजी सभापती राजेंन्द्र तांबे ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अनुप सुर्यवंशी , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदिप माने , सरपंच रविराज दुधगावकर , उपसरपंच ताहेर काझी , प्रकाश परखंदे , आदेश भापकर , राहुल तांबे , आनंद फडके ,सारिका माने , लक्ष्मी पानसरे , छाया जाधव , शिक्षणअधिकारी शबनम मुजावर यासह विविध संस्थाचे पदाधिकारी , सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरकार्यक्रम यशस्वीतेसाठी गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, गटशिक्षण अधिकारी सुनिल धुमाळ , विस्तार अधिकारी सनिल बोडरे , ग्रामविकास अधिकारी बबनराव धायगुडे यांच्यासह प्रशानाने व स्थानिक जनतेने सहकार्य केले.
॥सरपंच असावा तर असा ॥
शिरवळ शहरात एकुण चार जिपच्या शाळा असुन त्यातीलच सटवाई कॉलनी हि एक शळा. या शाळेची स्थापना २९ सप्टेंबर १९९८ रोजी झाली असुन सदयस्थितीत दोन शिक्षक व ग्रामपंचायती माफित एक स्वयंसेवक कार्यरत आहे. गत वर्षीची पटसंख्या ३५ होती तर चालु वर्षीची पटसंख्या ५५ इतकी असुन २०२४ – २५ शैक्षणिक वर्षापासून पाचवीच्या वर्गाला मान्यता मिळाली आहे. २०१९ पासुन शाळेच्या गरजा ग्रामपंचायतीकडे मांडण्यात येत होत्या . यातुनच २०१९ – २० मध्ये संडास बाथरूमची दोन युनिट बांधुन देण्यात आली. तसेच २०१९ पासुन या शाळेच्या नुतन इमारतीसाठी लोकनियुक्त सरपंच दुधगावकार यांनी परिसरातील कंपन्याच्या सामाजिक दायित्व निधीसाठी प्रयत्न करत होते. यातुनच त्यांनी एका खाजगी कंपनी कडुन सदर निधी २०२३ मध्ये उपलब्ध करून शिरवळकरांच्या स्वप्नातील आकर्षक व सुंदर शाळा २०२४ साली एका वर्षातचउभी केली. दरम्यान या आदर्श शाळेत संगणक कक्ष , स्मार्टबोर्ड , सीसीटिव्ही , सोलर पॅनेल, बाला पेंटिंग , परसबाग , प्लेईंग इक्विपमेंट या सुविधा उपलब्ध आहेत.