शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार केला असल्याची माहिती पोलिसांंनी दिली आहे.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुार, १३ वर्षीय पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना नराधम अशोक सोनवणे याने मुलीला जवळ बोलावत तुझ्या आजीला तुझे नाव सांगेल, अशी धमकी देत तिला बाजूला घेऊन जाऊन बळजबरीने अत्याचार केला. मात्र, पीडित मुलीला त्रास होऊ लागल्याने पालकांना शंका येताच त्यांनी मुलीला याबाबत विचारणा केली. त्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार तिच्या पालकांना सांगितला.
याबाबत पीडित बालिकेच्या पालकांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी पोलिसांनी आरोपी अशोक सोनवणे (पूर्ण नाव माहित नाही) याच्या विरुद्ध बलात्कार सह बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी हे करीत आहेत.