शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख
पिंपरखेड ता. शिरुर येथे एक महिला नागरिकांना गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळली. त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, एक महिला नागरिकांना गावठी दारुची विक्री करताना पोलिसांना मिळून आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी येथील दारूसाठा जप्त केला असून, दारुची विक्री करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे. याबाबत महिला पोलीस शिपाई तृप्ती निळकंठ पवार (वय ३० वर्षे रा. शिरुर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद आहे. त्यानुसार पोलिसांनी सखूबाई चंदर गायकवाड ता. पिंपरखेड ता. शिरुर जि. पुणे या महिलेवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खेडकर हे करीत आहेत.