एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी (maharashtra state road trasnport strike) त्यांच्या विविध मागण्यांसाठी ऐन गणेशउत्सावाच्या काळात आंदोलनाचे हत्यार उपसले असून, गणेशउत्सवासाठी काही दिवस शिल्लक असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे. हे धरणे आंदोलन एसटीच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आले आहे. ऐन गणेशउत्सव काळात एसटीची सेवा बंद झाल्याने वयोवृद्ध, विद्यार्थी यांचे हाल झाले आहे. तसेच एसटी समितीच्या वतीने विविध मागण्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन राज्यसरकारच्या कर्मचाऱ्यांएवढे करावे, ही प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून शासनाला करण्यात आली आहे.
ऐन सणासुदीच्या काळात एसटीची सेवा बंद झाल्याने अनेकांची मोठी गैरसोय झाली असून, त्यांचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर दि. ४ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या कामगार संघटनेच्या कृती समितीला बैठकीला बोलावले आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येणार असून, यातून तोडका काय निघतो, हे पाहणे महत्वाचे असणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांच्या गैरसोय होईल, अशी कृती न करण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून कर्माचारी वर्गाला करण्यात आले आहे. तसेच संप मागे घेण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath shinde) यांनी केली असून, बैठकीत सकारात्मक तोडगा निघेल, असे आश्वासन त्यांनी एसटी कर्माचाऱ्यांना दिले आहे.