पारगांवः प्रतिनिधी धनाजी ताकवणे
धायगुडे वाडी (ता. दौंड) येथील आदित्य ज्ञानदेव गडधे आणि ज्ञानेश्वरी ज्ञानदेव गडदे या बहीण भावांची एकाच वेळी धनुर्विद्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. युथ एशियन चॅम्पियनशिप धनुर्विद्या स्पर्धेसाठी सख्या भाऊ बहिणीची निवड झाल्याने केडगाव तसेच दौंड तालुक्यातून या बहिण भावाचे कौतुक होत आहे. पुढील महिन्यात चायनीज ताईपइ शहरात होणाऱ्या युथ एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी दिल्लीमधील सोनीपत या ठिकाणी पार पडली. यावेळी आदित्य गडधे आणि ज्ञानेश्वरी गडधे यांनी चमकदार कामगिरी केल्यामुळे त्यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
आदित्य गडधे हा सध्या पिंपरी चिंचवड मधील डॉ. डी. वाय .पाटील विद्यापीठात शिक्षण घेत आहे, तर ज्ञानेश्वरी गडदे ही सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय केडगांव येथे शिक्षण घेत आहे. आदित्य आणि ज्ञानेश्वरी धनुर्विद्या प्रशिक्षण शिक्षणासाठी बुलढाणा येथील शिवबा आरचर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय कोच चंद्रकांत इलक सर, प्रशांत शिंदे सर हे मार्गदर्शन करत आहेत. तर केडगावमध्ये ज्ञानेश्वरी गडधे हिला प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव सर, डॉ. प्रा. विशाल गायकवाड सर, अनिल सोनवणे सर हे क्रीडा शिक्षक मदत करत आहेत. आदित्य आणि ज्ञानेश्वरी यांनी उत्तम कामगिरी केल्यानंतर सख्या बहिण भावांची एकाच वेळी भारतीय संघात निवड होण्याचा नवा विक्रम या दोघांनी रचला आहे.
आदित्य गडधे आणि ज्ञानेश्वरी गडधे हे भीमा पाट्सचे माजी संचालक स्व. मल्हारी आबा गडधे यांचे नातू आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या दोघांचे अभिनंदन केले आहे.