बदलापूरः गेल्या काही तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात संतप्त झालेल्या नागरिकांकडून रेल रोको करण्यात आला आहे. तसेच नागरिकांकडून ज्या शाळेत चिमुकलींच्या लैंगिक शोषणाचा घृणास्पद प्रकार घडला, त्या शाळेची तोडफोड नागरिकांकडून करण्यात आली आहे. महिलांनी पोलीस यंत्रणेवर तसेच शासनावर रोष व्यक्त केला असून, आम्हाला लाडकी बहिण योजना नको, सुरक्षित बहिण योजना द्या, अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे. घटनेच्या १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजूनही आंदोलनकर्त्यांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. अजून देखील आंदोलन थांबण्याचे नाव घेत नसून, आता या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. अनेकांच्या प्रतिक्रिया या घटनेनंतर समोर आल्याच्या पाहिला मिळत आहे.
शाळेतील सफाई कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात
या घटनेच्या १२ तासांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या नामाकिंत शाळेतील सफाई कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.