बदलापूरः कोलकत्यातील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घपणे हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील साडेतीन वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शौषण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे तब्बल चार तासांपासून बदलापूर रेल्वे स्थानकात हजारोंच्या संख्येने पालकांकडून रेल रोको करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन पालक चांगलेच संतप्त झाल्याचे पाहिला मिळत आहे. आंदोलनकर्त्यांना गेल्या काही तासांपासून पोलीस समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र आंदोलनकर्त्यांकडून आरोपीला फाशीचीच शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येत आहे.
- संतप्त आंदोलनकर्त्यांकडून ज्या ठिकाणी घटना घडली तिथे तोडफोड करण्यात आली आहे.
- पोलिसांचा शाळेसमोर रुट मोर्चा
- पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांकडून लाठीचार्ज करण्यात आला. यामुळे आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.
- आरोपी पोलिसांच्या ताब्यात
- या प्रकरणी एसआयटी नेमणारः उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस
- हे प्रकरणी चार्ज शीट फायल करुन प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवावेः महिला आंदोलक
- बदलापूर पोलीस कोणत्याही प्रकरणात सहकार्य करीत नाहीः आंदोलक कर्त्या महिलांचा आरोप