भोर: येथील गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॅालेजमध्ये ४० गरजू विद्यार्थींनींना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच इनरव्हील क्लबकडून पाच डझन वह्या देखील यावेळी देण्यात आल्या. गणवेशासाठी सर्व डॅाक्टरांनी मदत केली. या कार्यक्रमासाठी डॉ. अरुण बुरांडे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती-राज्य सल्लागार ), डॉ. विद्या बुरांडे, डॉ. विरेश बिरादार डॉ. योगेंद्र आगटे, सविता कोठावळे (इनरव्हील क्लब अध्यक्षा), राकेश शेटे, डॉ. अपेक्षा पाटील, डॉ. अश्विनी मुचाटे तसेच इनरव्हील क्लबचा स्टाफ उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या पाटील आर. डी. व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. डॉ. बुरांडे व सविता कोठावळे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण पाटील मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील व्ही. यू यांनी केले. प्रास्ताविक मिरजे एस. एम. यांनी केले, तर आभार प्रदर्शन कुंभार मॅडम यांनी मानले.