विजांचा कडाकडाडट,मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस
भोर – सध्या भोरला अवकाळीचा तडाखा कायम असुन रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस बरसला.सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी जाणारांची तारांबळ उडाली.
यावर्षी में महिन्यात प्रचंड उन्हाचा तडाखा व उकाडा जाणवत आहे. दुपारी तीव्र उन्ह व दुपारनंतर मेघ गर्जनेसह, सोसाट्याचा वारा वाहत मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी ग्रामीण भागात शेतीची बांधबंदिस्तीची कामे सुरू असुन , काही ठिकाणी घराचे नवीन बांधकाम व दुरुस्ती देखभालीची कामे सुरू आहेत. अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्यान कामात व्यत्यय येत आहे. तसेच सध्या सर्वत्र लगीनसराई सुरू असुन अवकाळीने व-हाडी मंडळीची मोठी तारांबळ उडत आहे.तसेच दुपारनंतर लग्नाला जाण्यासाठी लोकांची मोठी धावपळ होत असताना पाउस आल्यास त्यांनालग्न मुहूर्ताचा पोहचणे शक्य होत नाही. मोठा पाऊस असल्याने वीज प्रवाह देखील खंडित केला जात आहे.विजांचा कडकडाटात असल्याने मोठृया दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी झाडाखाली, रानावनात, शेतात न थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.