अपंग ,बुजुर्ग व्यक्तींनी बजावला मतदानाचा हक्क
भोर – देशाच लक्ष लागलेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तिसऱ्या टप्पाची निवडणूक आज मंगळवार दि.७ मे रोजी शांततेत पार पडत असुन पवार कुटुंबातील सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या आमनेसामने लढत होत आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, सासवड, भोर व खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.एकूण २५१६ मतदान केंद्रे असून भोर ला ५६१ सर्वाधिक मतदान केंद्रे आहेत.
भोर तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असुन सकाळी ७ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी प्रचंड उन्हाचा तडाखा असल्याने सकाळी मतदान केंद्रावर गर्दी पहायला मिळाली. तालुक्यात मतदान केंद्रावर बुजुर्ग, जेष्ठ नागरिक , अपंग व्यक्तींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत आपले कर्तव्य पार पाडले. दुपारी १ वाजेपर्यंत जिल्ह्यात २७.५५ % मतदान झाले आहे .