जनावरांचा चारा व जळणाची सामग्री झाकण्यासाठी लगबग
भोर -तालुक्यात सर्वत्रच उन्हाचा चटका वाढला होता उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच सोमवारी (दि.१५)अचानक दुपारनंतर आलेल्या ढगाळ हवामानामुळे व अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसाळ्यासाठी जनावरांचा राखून ठेवलेला चारा भिजला जाऊ नये म्हणून तो झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली तसेच ग्रामीण भागातून चुलीला लागणा-या जळणाच्या साधनसामग्री भिजु नये म्हणून त्यावर झाकण टाकण्यासाठी लगबग झाली. काही ठिकाणी रब्बी हंगामातील ज्वारीचे पीक काढले नसल्याने व काही ठिकाणी ज्वारीचे पीक उपटून वाळवलेला जनावरांचा चारा कडबा भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हवेत गारवा निर्माण झाल्याने हे काळ का होईना नागरिकांना उकाड्यापासून सुटका मिळाली.
भोर तालुक्यातील विस गाव खो-यात व पश्चिम पट्ट्यात वीट भट्टीच नुकसान झाले असून काही भागातील यात्रा सुरू असल्याने छोटे व्यावसायिकांची तारांबळ उडाली .सध्या लगीन सराई सुरू असल्याने घरी जाताना अनेकांनची तारांबळ उडाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीज प्रवाह खंडित झाला होता.वीज नसल्याने अनेकांना त्रास झाला. अवकाळीचा हा कहर सर्वांनाच त्रासदायक ठरत होऊ नये म्हणून विजांच्या होणा-या कडकडाटात व या मुसळधार पावसात नागरिकांनी बाहेर पडू नये आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.