कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शहरातुन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुटमार्च
सध्या सर्वत्र निवडणूकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भोर शहरातुन पोलिसांनी बुधवार (दि १३ ) सायंकाळी ५.४५ ते ६.४५ शहरातुन पथसंचलन,रूटमार्च काढला.
भोर पोलीस स्टेशन हद्दीतील शहराच्या शिवतीर्थ चौपाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन , नगरपालिका चौक, मंगळवार पेठ रस्ता,एसटी स्टँड , राजवाडा चौक- सम्राट चौक या मार्गे रुटमार्च , पथसंचलन केले .या रुटमार्च मध्ये भोर पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव,शीला खोत ,सहा उपनिरीक्षक अशोक खुटवड तसेच भोर पोलीस ठाण्यातील १६ पोलीस अंमलदार यांचेसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (CISF) एकुण २अधिकारी व ४२ जवान सहभागी झाले होते. येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या काळात नागरिकांनी शांतता राखण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन भोर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी केले आहे.