पुणे : पुण्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे मनसेला पुण्यात मोठा धक्का बसला आहे. साहेब मला माफ करा, अशी पोस्ट लिहत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेरची साद घातली.
मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. त्यांनी राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत असलेला फोटो शेअर करत साहेब मला माफ करा असंही म्हटलंय. पक्षांतर्गत गटबाजीमुळे वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे.
आता पुढे काय? याबाबत अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही.