पाचगणी : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पाचगणी शहर व परिसरातील पाच दिवसांच्या घरगुती गणपती व गौरीचे आज (शनिवारी) विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी टेबललॅंड पठारावरील तलाव गर्दीने फुलून गेला होता.
गेल्या पाच दिवसांपासून भक्तिमय वातावरणात घरोघरी श्रींची स्थापना करण्यात आली होती. शनिवारी पाचव्या दिवशी गणपतीसह गौरीचे विसर्जन करण्यात आले. सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतले होते. (Pachgani News ) विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पाचगणी पोलीसांनी योग्य नियोजन केले होते. त्यामुळे भाविकांना विसर्जन मार्गावर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका कर्मचाऱ्यांनी विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती.