शिरवळ: खंडाळा तालुक्यातील भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. लोणंद-शिरवळ रस्त्यावर दोन तास ठिय्या मांडल्याने वाहतूक कोंडी झाली. अखेर वाई प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९९७ मध्ये भादे देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन पुनर्वसन विभागाने संपादित केली होती. त्या जमिनीवर सातारा जिल्हाधिकारी यांचे नाव देखील लावण्यात आले होते. त्यावर भादे देवस्थानने पुणे आयुक्तांकडे अपील दाखले केले; परंतु त्यांनी ते फेटाळून देवस्थानच्या क्षेत्रावर पुनर्वसन विभागाने गणपत पावगी यांना वाटप केले. मात्र, जमीन देवस्थानच्या ताब्यात असल्याने ट्रस्टने ती एका शेतकऱ्यास वापरण्याकरीता दिली आहे.
सोमवारी (५ मार्च) पावगी हे शिरवळ पोलिस प्रशासनासह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी जमिनीचा ताबा घेण्यास विरोध केला व तो ताबा फेटाळून लावला तसेच मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सर्व ग्रामस्थ भादे स्टॅण्ड येथे एकवटले व लोणंद-शिरवळ रस्त्यावर ठाण मांडून बसले. दोन तासांच्या रास्ता रोकोनंतर प्रांताधिकारी व तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
- आंदोलनाची प्रमुख मागणी:
* देवस्थान ट्रस्टची जमीन ताब्यात घेण्याची कारवाई तात्काळ थांबवावी.
* जमिनीचा ताबा देवस्थान ट्रस्टला द्यावा.
* या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. - *प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन:**
* जमिनीचा ताबा देण्याची कारवाई तात्काळ थांबवण्यात आली आहे.
* या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
* जमिनीचा ताबा कोणाला द्यायचा याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. - **पुढील वाटचाल:**
प्रांताधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले आहे. परंतु, जमिनीचा ताबा कोणाला द्यायचा याबाबत लवकरच निर्णय न घेतल्यास ग्रामस्थ पुन्हा आंदोलन छेडण्याची शक्यता आहे.
पोलिस उपनिरिक्षकाचे आर्थिक लागे बांधे असल्याचा ग्रामस्थांचा आरोप?
भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले यावेळी त्याठिकाणी शिरवळ पोलिस अधिकारी व पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये तसेच शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक यांचे खातेदार यांच्याशी आर्थिक लागेबांधे असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले यामध्ये पोलिस उपनिरीक्षक व ग्रामस्थ यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.संबंधित पोलिस उपनिरीक्षक हे जागेचा ताबा घेण्यासाठी खातेदार पावगे यांच्याच वाहनात खाजगी सुरक्षारक्षक यांच्या सह आले व ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असता ग्रामस्थांचे पोलिस उपनिरीक्षक यांनी हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिस उपनिरीक्षक दुसऱ्या दिवशी रास्ता रोको केल्या ठिकाणी आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांच्या कारणाम्यांचा पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचून दाखवला. संबंधित पोलिस उपनिरीक्षक यांचे खातेदार यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोडले असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले..