शिरवळ : पुणे सातारा महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरला पाठिमागून कारणे जोरदार धडक देऊन अपघात झाला या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून कारचालक किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितनुसार, पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ पंढरपूर फाटा जवळ कारची उभ्या ट्रेलरला पाठिमागून जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला.सातारच्या दिशेने आलेला ट्रेलर हा टायर चेक करण्यासाठी व चहा पिण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरच गाडी कडेला लावून थांबलेला होता.
त्यानंतर एम एच १२ एस एफ ३८२१ हि कार महाबळेश्वर येथे प्रवासी सोडून परतीच्या दिशेने पुणे येथे जात असताना हायवे लगत चहा पिण्यासाठी थांबलेल्या ट्रेलरचा अंदाज न आलेने कारची ट्रेलरला जोरदार धडक बसून हि कार पूर्णपने ट्रेलरखाली गेली. गाडी मध्ये कारचालक व्यतिरिक्त कोणी नसलेले मोठी जीवित हानी होण्यापासून टळली आहे वाहन चालक किरकोळ जखमी झाला असून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पुढील उपचारासाठी वाहन चालकास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाता नंतर गाडी खाली अडकलेली कार काढण्यासाठी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती यावेळी वाहतूक थांबविताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली
हायवे लगतच्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाढले अपघात?
अपघाताच्या घटना या हायवे लगत असणाऱ्या अनधिकृत चहा टपऱ्यामुळे वारंवार घडत आहेत. यापूर्वीही रस्त्याच्या कडेला चहा-नाष्टा करण्यासाठी थांबलेल्या वाहनांमुळे बरेच छोटे मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे हे अनधिकृत टपरीवाले रस्त्यावर अतिक्रमण करून कोणाच्या वरदहस्ताने चालू आहेत. असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासन व स्थानिक पोलीस प्रशासन या अनधिकृत व्यवसायावर कारवाही करणार का? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करीत आहेत.