Sunday, November 1, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

by SBPRNL
November 1, 2026
नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

भोर : तालुक्यातील नसरापूर येथे जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. गट क्रमांक ८८ मधील ८.३९ आर क्षेत्राच्या जागेवरील तारकंपाउंडचे नुकसान करण्यात आल्याचा आरोप असून, या प्रकरणी पाच जणांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे नसरापूर परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जागेवर तारकंपाउंड उभारण्यात आले होते. मात्र, जमिनीच्या वादातून २२ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींनी या ठिकाणी जाऊन तारकंपाउंडची तोडफोड केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. संबंधितांनी संगनमत करून कामगारांच्या मदतीने जागेत अनधिकृत प्रवेश केला आणि तेथील तारकंपाउंडचे नुकसान केले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

You might also like

No Content Available

या तोडफोडीत अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी गणेश चांडक, लक्ष्मीकांत दिग्रजकर, महेश पेने, आनंता भडवळे आणि अनिल निवंगुणे अशा पाच जणांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमिनीच्या वादातून थेट तारकंपाउंडची तोडफोड झाल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील वाद कायदेशीर मार्गाने सोडविण्याऐवजी अशा प्रकारे मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेची नोंद राजगड पोलिसांनी घेतली असून, नेमकी तोडफोड कोणत्या कारणातून करण्यात आली, यामागे आणखी काही वाद आहेत का, तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांची भूमिका काय आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.

Tags: #नसरापूर #भोर #पुणेग्रामीण #राजगडपोलीस #जमिनीचावाद #तारकंपाउंडतोडफोड #CrimeNews #BhorNews #Nasrapur #RajgadNewsLive #PuneNews #BreakingNews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

नसरापूरमध्ये जमिनीच्या वादातून तारकंपाउंडची तोडफोड; पाच जणांविरोधात राजगड पोलिसांत गुन्हा दाखल!

November 1, 2026
PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

PURANDAR | किरकोळ वाद, रोजचा त्रास..यातूनच घडले पुरंदर दुहेरी हत्याकांड!

November 1, 2026
निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

निधन वार्ता : कुरुंजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेशदादा शिळीमकर यांना मातृशोक; मालन शिळीमकर यांचे निधन

November 1, 2026
अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अवैध वेश्याव्यवसाय प्रकरणी वेळूतील आमराई रिसॉर्ट लॉजिंगवर पोलिसांची कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. अधिकृत सूचनासाप्ताहिक भूमिश्री (RNI क्र. MHMAR/26/A4837) यांचे राजगड न्यूज लाईव्ह हे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. साप्ताहिक भूमिश्रीच्या वतीने डिजिटल वृत्तांकन व संबंधित अधिकृत कामकाजासाठी राजगड न्यूज लाईव्ह कार्यरत राहील. सर्व संबंधित अधिकारी व प्रशासनाने याची नोंद घ्यावी.कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group